पालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना लागू करण्याचा निर्णय

May 5, 2011 11:57 AM0 commentsViews: 2

05 मे

मुंबईवगळता सर्व महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण नेमकी प्रभाग रचना कशी असेल आणि किती नगरसेवकांची असेल याबाबत मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

त्यामुळे प्रभाग रचनेबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत. बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रभाग रचनेच्या मुद्यावरून मतभेद झाले होते. काँग्रेसला 4 नगरसेवकांची प्रभाग समिती हवीय तर राष्ट्रवादीला मात्रं मात्र दोनच नगरसेवकांची प्रभाग समिती हवी आहे. याखेरीज थेट लोकांमधून नगराध्यक्ष निवडण्याच प्रस्ताव मात्र मंत्रिमंडळाने नाकारला.

close