लखनऊमधला टाटा मोटर्सचा कारखाना सहा दिवस बंद

November 10, 2008 11:51 AM0 commentsViews: 2

10 नोव्हेंबर लखनऊ टाटा मोटर्सनं त्यांचा लखनऊमधला कारखानादेखील सहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी टाटांनी जमशेदपूरमधला कारखाना उत्पादन कमी करण्यासाठी सहा ते आठ नोव्हेंबर बंद ठेवला होता .पैशांची कमतरता आणि जास्त व्याजदरांमुळे लोकांची खरेदी कमी झाली आहे असं टाटा मोटर्सचं म्हणणं आहे. दरम्यान देशातली स्टील उत्पादन करणारी एक मोठी कंपनी सेलही आता उत्पादनाचं प्रमाण कमी करणार आहे. कंपनी त्यांच्या रुरकेला कारखान्यामधलं उत्पादन घटवणार असल्याचं सूत्रांकडून समजलंय. सध्या देशातल्या बहुतेक उद्योगांना आर्थिक अडचणी सहन कराव्या लागत आहेत.

close