मुख्यमंत्र्यांचा अशोक चव्हाणांना दणका; मंजूर केलेले प्रकल्प रद्द

May 5, 2011 4:50 PM0 commentsViews: 3

05 मे

आदर्श घोटाळ्यामुळे मुख्यमंत्रीपद गमवावं लागलेल्या अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांनी आणखी एक धक्का दिला आहे.अशोक चव्हाणांनी जाता जाता मंजूर केलेले थ्री केचे दोन प्रकल्प मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रद्द केले आहेत. चेंबुर आणि मालाड इथल्या या 2 एसआरए प्रकल्पांची इरादा पत्रं म्हणजेच लेटर ऑफ इंटेन्ट मुख्यमंत्र्यांनी रद्द केली आहेत अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिली आहेत.

अशोक चव्हाण यांच्या काळात शेवटच्या दिवसांमध्ये, घाईघाईने या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. त्यातही अगदी शेवटच्या दिवशी 11 नोव्हेंबर 2010 ला सात ते आठ अधिकार्‍यांच्या सह्यांनिशी इरादा पत्र जारी करण्यात आले होते. ही बाब सचिव स्तरावरच्या चौकशीत स्पष्ट झाल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पांची इरादा पत्रं रद्द केली.

close