आदर्श प्रकरणी 3 अधिकार्‍यांना अटक

May 5, 2011 1:00 PM0 commentsViews: 2

05 मे

आदर्श सोसायटी गहाळ फाईल प्रकरणी तीन अधिकार्‍यांना सीबीआयने अटक केली आहे. या विभागाचे डेस्क ऑफिसर गुरूदत्त वाजपे, असिस्टंट टाऊन प्लॅनर एन.एन.नार्वेकर आणि वामन राऊळ या तीन अधिकार्‍यांना अटक करण्यात आली आहे. उद्या या अधिकार्‍यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आदर्श घोटाळ्यात केंद्रीय मंत्र्यांचा हात असल्याचे धागेदोरे मिळाल्याचे सीबीआयने आज कोर्टात सादर केलेल्या स्टेटस रिपोर्टमधून उघड झालंय. या घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांचीही चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सिंप्रित सिंग यांनी दाखल केली आहे.

या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सीबीआयने ही माहिती दिली. या मंत्र्यांविरोधात सीबीआयला ठोस पुरावे मिळाले आहेत आणि त्यांची चौकशी करणार असल्याचे सीबीआयनं कोर्टाला सांगितलं. पण हे केंद्रीय मंत्री कोण याची नावं मात्र सीबीआयनं दिलेली नाहीत.

तसेच आदर्शच्या तपासात आज हायकोर्टाने सीबीआयला फटाकरलंय. आदर्शप्रकरणातील महत्त्वाची फाईल गहाळ झाल्याचा उल्लेखच सीबीआयने कोर्टाला सादर केलेल्या स्टेट्स रिपोर्टमध्ये केलेला नाही. यावरुन कोर्टाने आज सीबीआयला फटकारलं. तसेच सीबीआयच्या तपासावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली.

close