औद्योगिक वसाहतीत बिल्डरांना भूखंड वाटला

May 5, 2011 4:31 PM0 commentsViews: 3

05 मे

राज्यातील औद्योगिक वसाहती याआधीच आजारी पडल्या आहे. त्यांची स्थिती सुधारायची सोडून या वसाहतींमधील मोक्याचे भूखंड बिल्डरांना दिले जात आहे. औरंगाबादमधील अशी काही प्रकरण माहितीच्या अधिकाराखाली उघड झाली आहे. याप्रकरणी आयटक या कामगार संघनटेने आता थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तक्रार केलीय.

औरंगाबादच्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत एपीआय कंपनीच्या जागेवर हा प्रोझोन मॉल उभा राहिला आहे. आणि ब्लू बेल ही रेसिडेन्सिशल वसाहतही आहे. एपीआय कंपनीची ही 50 एकर जागा कामगारांची थकबाकी देण्यासाठी जागा विकण्याचा निर्णय झाला होता. पण हे सोडून एपीआय कंपनीने ही जागा विनोद सुराणा आणि संतोष मुथियान या बिल्डरांच्या ताब्यात दिली. ही धक्कादायक बाब माहितीच्या अधिकाराखाली उजेडात आली आहे.

राज्यभरातील आजारी औद्योगिक वसाहतीतील जागा सरकारने ताब्यात घेऊन त्यावर म्हाडा किंवा सिडकोकडून गृहप्रकल्प उभारावेत अशी मागणी आम्ही केली. ही मागणी करीत असताना माहितीच्या अधिकारात औरंगाबादच्या जागेची माहिती आमच्याकडे आलीय. ती अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे या जागेचा व्यावसायिक वापर करणार्‍यांकडून तातडीने रक्कम सरकार जमा करण्याची आमची मागणी आहे.

या जमिनीचे व्यवहार विनोद सुराणा, संतोष मुथियान यांच्याशी संबंधित असलेल्या सनराईज इन्फोपार्क, हरे रामा हरे कृष्णा सहकारी गृहनिर्माण संस्था, अंजठा इन्फास्ट्रकचर,प्रेमचंद बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स, गेनफू बिल्डर्स या सगळ्या कपंन्यांशी झाले. सुमारे दोन हजार रुपये प्रति चौरस फूट इतका भाव असलेल्या या जागेवर झालेले पाचशे कोटींहून अधिक व्यवहारच संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असता अकरा जणांना केवळ एक लाख रूपये भरून तेराशे पन्नास चौरस मीटरच्या सदनिका देण्यात आल्याचे उघड झाले. जमीन विकून कामगारांची देणी देणं राहिलं बाजूलाचआणि कोट्यवधी रुपयांच्या जमिनीतून असा व्यावसायिक मलिदा मिळवला गेला याबद्दल आता हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

close