तरूणीनं भरधाव वेगात गाडी चालवत पोलिसाला दिली धडक

May 5, 2011 2:41 PM0 commentsViews: 6

05 मे

पुण्यातील आकुर्डी इथल्या सॉफ्टवेअर इंजिनीयर तरुणीनं भरधाव वेगान गाडी चालवत एका पोलिसाला धडक दिली. या अपघातात पोलीस हवालदार गंभीर जखमी झाला. महत्वाच म्हणजे ही युवती विरुध्द दिशेन गाडी चालवत होती. 11 च्या सुमारास हा अपघात झाला. घटनेत जखमी हवालदाराला आकुर्डी इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. निगडी पोलिसांनी या युवतीला अटक केली आहे. तिची झेन गाडीही जप्त करण्यात आली आहे. रुचिता नेमाडे असं युवतीच नाव असून ती एका लग्णासाठी पिपंरी चिचंवड इथं आली होती.

close