ओसामाच्या मृतदेहाचे फोटो प्रसिद्ध केले जाणार नाहीत !

May 5, 2011 5:35 PM0 commentsViews: 5

05 मे

ओसामाच्या मृतदेहाचे फोटो प्रसिद्ध केले जाणार नाहीत असं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलंय. फोटो प्रसिद्ध करण्यावरून व्हाईट हाऊसमध्ये मतभेद होते. ओसामाचा मृत्यू झाला याबद्दल कोणतीही शंका राहू नये यासाठी फोटो प्रसिद्ध करायला हवेत असं सीआयए च्या प्रमुखांचं मत होतं. पण त्यामुळे जगभरात खासकरून पाकिस्तान आणि अरब देशांमध्ये अमेरिकेविरोधात भावना भडकू शकतात अशी भीती ओबामा यांना वाटतेय. त्यामुळेच त्यांनी फोटो प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला. ओबामाच्या मृत्यूचे पुरावे कोणाला देण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

ओसामाचा उजवा हात अल जवाहिरीनंच केला त्याचा विश्वासघात

अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा जवळचा सहकारी अयमान अल जवाहिरी यानंच ओसामाचा विश्वासघात केला अशी बातमी सौदी अरेबियातल्या एका वर्तमानपत्राने दिली आहे. अल कायदाच्या प्रमुख पदासाठी ओसामा आणि जवाहिरी यांच्यात छुपा संघर्ष सुरू होता. अबू अहमद नावाच्या ओसामाच्या दूतावर पाळत ठेवून अमेरिकेनं ओसामाचा ठावठिकाणा शोधून काढला.

ओसामाचा हा दूत मुळात जवाहिरीचा विश्वासू होता, आणि जवाहिरीच्या आदेशानुसारच तो काम करत होता असं या वर्तमानपत्राने म्हटलंय. जवाहिरी हा अल कायदाच्या इजिप्तमधील संघटनेचा हा प्रमुख आहे. 2004 मध्ये ओसामा आजारी पडला होता. त्यावेळेपासून जवाहिरीनं अल कायदाचा संपूर्ण ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. जवाहिरीच्या गटातल्या अतिरेक्यांनीच अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरचा आदिवासी भाग सोडायला ओसामाला भाग पाडलं, असा दावाही या वर्तमानपत्रानं केला. अल कायदाचा एक महत्त्वाचा कमांडर सैफ अल आदिल यानंही ओसामाला संपववण्याचा कट आखला होता असं वर्तमानपत्राचं म्हणणं आहे. अल कायदाच्या प्रमुखपदाच्या चर्चेत आदिल याचंही नाव आहे.

close