सीडी प्रकरणी शांतीभूषण यांना क्लीन चिट

May 5, 2011 5:42 PM0 commentsViews: 2

05 मे

भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात अण्णांच्या बाजूने उभे राहिलेले प्रसिद्ध वकील शांती भूषण यांना आज चंदिगडच्या सरकारी लॅबने दिलासा दिला आहे. त्यांच्या विरोधातली सीडी खरी नाही आणि त्यात फेरफार करण्यात आला असा अहवाल चंदिगडमधील सीएफएसएल म्हणजे सेंट्रल फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीनं दिला.

एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून सीडीतला आवाज कट आणि पेस्ट करून घेतल्याचा या लॅबचा निष्कर्ष आहे. ही सीडी मीडियात प्रसिद्ध झाल्यानंतर भूषण पितापुत्रांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांनी स्वतंत्र तज्ज्ञांकडून आणि लॅबकडून या सीडीची टेस्ट करून घेतली. त्यात या सीडीत फेरफार करण्यात आल्याचा निष्कर्ष निघाला होता. सरकारनंही ही सीडी टेस्टसाठी पाठवली होती. आणि ती खरी आहे असा निष्कर्ष यापूर्वी दिल्लीतल्या फॉरेन्सिक लॅबने काढला होता. पण चंदिडगडमधील सरकारी फॉरेन्सिक लॅबने मात्र हा दावा खोटा ठरवला आहे.

close