वैमानिकांचा संप मिटण्याची शक्यता

May 5, 2011 5:51 PM0 commentsViews: 3

05 मे

एअर इंडिया व्यवस्थापन आणि पायलट्समधील चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे नागरी उड्डयण मंत्रालयातल्या सूत्रांनी आयबीएन नेटवर्कला सांगितलंय. हा संप उद्यापर्यंत मिटू शकेल असंही सूत्रांचे म्हणणं आहे. ज्या पायलट्सना कामावरून काढण्यात आलं होतं, त्यांना परत घेतलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, एअर इंडिया एवढ्या संकटात का आहे याचं उत्तर आमच्या हाती लागलेल्या सीएजीच्या अहवालावरून स्पष्ट होतंय.

नागरी वाहतूक मंत्रालयाने एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सला कोट्यवधी रुपयांची विमानं विकत घ्यायला भाग पाडलं, केवळ 28 विमानांची गरज असताना 68 विमानं खरेदी करायला लावली. या बळजबरीच्या खरेदीमुळे 10 हजार कोटींचे नुकसान झालं आणि एअर इंडियाची आर्थिक स्थिती बिघडली असं कॅगने आपल्या अहवालात म्हटलंय. नियोजन मंडळ आणि आर्थिक सल्लागारांनी दिलेल्या सल्ल्यांकडे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने दुर्लक्ष केल्याचंही कॅगच्या अहवालात म्हटलंय.

close