पुरोहित यांनी जाहीर माफी मागावी !

May 6, 2011 9:27 AM0 commentsViews: 1

06 मे

मुंबई भाजपचे अध्यक्ष राज पुरोहित यांनी काल भर जाहीर सभेत अंकिता राणे या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते. या प्रकरणी पुरोहित यांनी पत्रकार परिषद घेवून माझी आणि माझ्या कुटुंबीयांची जाहीर माफी मागावी. अशी मागणी अंकिता राणे हिने केली आहे.

ठाण्यात पाणी पुरीवाल्याचा विकृतपणा उघड करणार्‍या अंकिता राणे या मुलीच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवण्याचा धक्कादायक प्रकार काल घडला. आणि हा प्रकार करणारे आहेत चक्क मुंबई भाजपचे अध्यक्ष राज पुरोहित. एका पुरूषाचं असलं व्हिडिओ शुटिंग करणार्‍या मुलीचं चारित्र्य काय असेल अशा शब्दात राज पुरोहित यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. याहून धक्कादायक प्रकार म्हणजे राज पुरोहित यांनी एका जाहिरसभेत ही मुक्ताफळं उधळली होती.

या प्रकारानंतर अंकिता राणे या मुलीनं राज पुरोहित यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तसेच राज पुरोहित यांनी महिलांचा अपमान केल्यानं त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी मनसेनं केली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणी राज पुरोहित यांनी काल संध्याकाळी आयबीएन लोकमतशी बोलताना सारवा सारव केली होती. आणि आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं म्हटलं होतं.

close