मुख्यमंत्र्यांच्या निवडणुकीला अनिल परब यांचं आव्हान

May 6, 2011 9:53 AM0 commentsViews: 9

06 मे

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवडणुकीला शिवसेनेचे माजी आमदार अनिल परब यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. सुप्रीम कोर्टाची याबाबत मुख्यमंत्र्याना नोटीस देण्यात आली आहे. 6 आठवड्याच्या आत उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत. आता पुढील सुनावणी 1 जूनला होणार आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासाठी संजय दत्त यांनी आपली विधानपरिषदेची जागा सोडली होती. संजय दत्त यांच्या निवडणुकीच्या वेळी मनसेच्या चार निलंबित आमदारांनी मतदान केल होतं. त्यामुळे अनिल परब यांनी या निवडणुकीलाच आव्हान दिलं होतं.

close