सोन्याचा भाव 22 हजारांच्यावर

May 6, 2011 10:11 AM0 commentsViews: 14

06 मे

अक्षयतृतीयेचा मुहूर्त सोनं खरेदीसाठी शुभ मानला जातो. पण सोन्याच्या वाढलेल्या किंमती आता या मुहूर्त खरेदीमध्ये येत आहे. गेल्या वर्षी अक्षयतृतीया होती 16 मे ला आणि तेव्हा सोन्याचा भाव होता 10 ग्रॅमला 18265 रुपये. तर सध्या सोन्याचा दर आहे 22 हजारांच्या वर. मुहुर्ताच्या खरेदीवर याचा थोडाबहुत परिणाम जाणवत असला तरी गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळणार्‍यांची संख्या मात्र कायम आहे.

close