सरस्वती देवी समोर पुस्तकांचा आरास

May 6, 2011 7:39 AM0 commentsViews: 73

06 मे

गुढी पाडव्यापासून ते अक्षय तृतीयापर्यंत घराघरात चालतं ते चैत्र गौरी पूजन. चैत्र गौरी ही अन्नपूर्णा देवी आहे. आणि देवीच्या अनेक रुपांपैकी एक म्हणजे सरस्वती. मग देवीची पूजा पारंपरिक फुलांऐवजी सरस्वतीचं प्रतिक असलेल्या पुस्तकांनी करावी या विचाराने पुण्यातील सहकारनगर भागात शर्वरी दाते यांनी घरातील शंभर पुस्तकांचीच आरास मांडली. नाशिकमधील कुसुमाग्रज ग्रंथदिंडीचे काम पाहणार्‍या शर्वरी दाते दरवर्षी चैत्र – गौरीची आरास करण्यासाठी अभिनव कल्पना साकारतात.

close