आठवले जाणार पुन्हा मातोश्रीवर !

May 6, 2011 1:54 PM0 commentsViews: 3

06 मे

शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची चर्चा असतानाच आज रामदास आठवले आणि नितीन गडकरी यांची भेट झाली. नितीन गडकरींनी रामदास आठवलेंचं एनडीए मध्ये स्वागत केलंय. भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष मिळून राज्यात चांगला पर्याय निर्माण करू शकतात.यावेळी काँग्रेसच्या दुष्पप्रचाराला आठवलेंनी बळी पडु नये असं नितीन गडकरी म्हणाले आहे. तर महागाई, भ्रष्टाचार या मुद्यावर विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी केलंय. आठवले यासंदर्भात बाळासाहेब ठाकरेंचीही भेट घेणार आहेत.

close