आदर्श प्रकरणी 3 अधिकार्‍यांना सीबीआय कोठडी

May 6, 2011 12:29 PM0 commentsViews: 6

06 मे

आदर्श फाईल गहाळ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन जणांना 4 दिवसाची सीबीआयची कोठडी मिळाली आहे. आदर्श फाईल गहाळ प्रकरणी काल रात्री तीन अधिकार्‍यांना सीबीआयने अटक केली होती. या विभागाचे डेस्क ऑफिसर गुरूदत्त वाजपे, असिस्टंट टाऊन प्लॅनर एन. एन.नार्वेकर आणि वामन राऊळ या तीन अधिकार्‍यांना अटक करण्यात आली आहे. आज या अधिकार्‍यांना कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने त्यांनी 4 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

close