बालगंधर्व पाहून डोळे पाणावले

May 6, 2011 12:45 PM0 commentsViews: 1

06 मे

बालगंधर्व हा सिनेमा आजच राज्यभरात रिलीज झाला आहे. राज्यभरात प्रेक्षक हा सिनेमा बघून अक्षरश: भारावलेले आहेत. पण यामध्येच एक प्रतिक्रिया खरंच वेगळी आणि अतिशय भावपूर्ण अशी आहे. खुद्द बालगंधर्व यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य ज्यांना मिळाले असे एक रंगकर्मी आज दादरच्या प्लाझा थिएटरमध्ये बालगंधर्व सिनेमाचा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहण्यासाठी आले होते. सिनेमा पाहून बालगंधर्वांच्या रुपातील सुबोधला पाहून त्यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आलं होतं.

close