वैमानिकांचा संप अखेर मागे

May 6, 2011 5:28 PM0 commentsViews: 3

06 मे

एअर इंडियाच्या पायलट्सचा संप आज दहाव्या दिवशी अखेर मागे घेण्यात आला आहे पायलट्स आणि मॅनेजमेंट यांच्यात आज चर्चा झाली. आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी एअर इंडियाचे पायलट्स गेले 10 दिवस संपावर गेले होते. एअर इंडिया आणि पूर्वीच्या इंडियन एअरलाईन्स या कंपन्यांतल्या पायलट्सच्या पगारात मोठा फरक आहे. एअर इंडियाच्या तुलनेत इंडियन एअरलाईन्सच्या पायलट्सना कमी पगार मिळतो अशी तक्रार आहे. पायलट्सच्या मागण्यांवर विचार करण्याचं आश्वासन मॅनेजमेंटनं दिल्याचं समजतंय. त्यामुळे आज रात्रीपासून सर्व पायलट्स कामाववर रुजू होणार आहेत.

close