ओसामाचं मृत्यू ठिकाण बनलंय पर्यटन ठिकाण

May 6, 2011 5:47 PM0 commentsViews: 2

06 मे

ओसामा अबोटाबादमध्ये जिथे राहत होता ते ठिकाण आता त्याच्या मृत्यूनंतर पर्यटनाचं ठिकाण बनलंय. जगातील सर्वात खतरनाक अतिरेकी जिथं राहत होता, ते घर कसं आहे हे पाहण्याची पाकिस्तानी लोकांना उत्सुकता आहे. ओसामाच्या घराचं गेट बंद करण्यात आलं आहे. पण पर्यटकांना घराच्या परिसरात फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. ओसामाच्या घराकडे लहान मुलांपासून ते तरूणापर्यंत सर्वच जण उत्सुकतेनं बघत आहे. घराच्या गेटजवळ उभं राहून फोटोही काढले जात आहे. घराजवळच्या परिसरात लोक मोठ्या संख्येनं जमले आहे.

दरम्यान हे घर आता जमीनदोस्त करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी बातमी पाकिस्तानी मीडियाने दिली आहे. ओसामाच्या मृत्यूनंतर त्याचं घर कट्टरवाद्यांचं श्रद्धास्थान होऊ नये यासाठी ही कारवाई केली जाणार आहे. सध्या त्याचं घर पाकिस्तानी लष्कराने सील केलंय. अर्शद खान या व्यक्तीच्या नावावर ही मालमत्ता आहे. तो ओसामासोबतच अमेरिकन कमांडोजच्या कारवाईत मारला गेला.

close