म्हाडाची स्वस्त घरांची योजना

May 7, 2011 12:39 PM0 commentsViews: 1

7 मे, मुंबई

मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना घर घेण्यासाठी म्हाडानं स्वस्त दरातली स्कीम सुरु केलीये. या योजनेतंर्गत म्हाडानं 4 हजार 34 घरांची लॉटरी जाहीर केलीये. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केलीये.आणि हा अर्ज भरण्याबरोबरच आता डिपॉजिटचीही आवश्यकता होती. पण यावर्षीच्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये गेल्यावर्षीप्रमाणं डिपॉजिटसाठी कर्ज मिळण्याची सुविधा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी उपलब्ध नव्हती. ती आता 9 मे पासून अक्सिस बँक सुरू करत आहे.

close