रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनात तरुणांच्या सहभागाची गरज – शरद पवार

May 9, 2011 8:33 AM0 commentsViews: 27

09 मे

रयत शिक्षण संस्थेचा कारभार अधिक व्यापक करण्यासाठी तरुणांना व्यवस्थापनात सहभागी करुन घेण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलंय. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 52 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सातार्‍यातील रयत शिक्षण संस्थेत आज पार पडला. त्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने शिक्षकांना, प्राध्यापकांनाही शिष्यवृत्ती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी जाहीर केलं. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत 50 टक्के महिला आरक्षण असलं तरी रयत शिक्षण संस्थेत महिलांचा हवा तेवढा सहभाग नसल्याची खंतही शरद पवार यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला वनमंत्री पतंगराव कदम, पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते एन. डी. पाटील, जेष्ठ आमदार गणपतराव देशमुख, आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते उपस्थित होते.

close