राजस्थान आणि चेन्नई आज आमने सामने

May 9, 2011 8:45 AM0 commentsViews: 2

09 मे

आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आज आमने सामने येत आहे. पण पॉईंटटेबलच्या दृष्टीनं ही मॅच खुप महत्वाची ठरणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या होमग्राऊंडवर म्हणजे जयपूरमध्ये ही मॅच खेळवली जातेय. या दोन्ही टीम दुसर्‍यांदा आमने सामने येत आहे. आणि पहिल्या मॅचमध्ये चेन्नईने राजस्थानचा 8 विकेट राखून पराभव केला होता. साहजिकच राजस्थान टीम पराभवाचा वचपा काढण्यासाठी खेळेल. पण राजस्थानबरोबरच चेन्नईसाठीदेखील ही मॅच तितकीच महत्वाची ठरणार आहे. कारण पॉईंटटेबलमध्ये चेन्नईची टीम चौथ्या तर राजस्थान रॉयल्स पाचव्या क्रमांकावर आहे. आणि आघाडी घेण्यासाठी दोन्ही टीमला ही मॅच जिंकावीच लागणार आहे.

close