भारतात अतिरेकी हल्ल्यांचे टार्गेट्स पाकचे लष्कर ठरवते : विकिलिक्स

May 9, 2011 8:55 AM0 commentsViews: 5

09 मे

ओसामा बिन लादेन पाकिस्तानात राहत होता हे उघड झाल्यानंतर अडचणीत आलेल्या पाकिस्तानला आता विकिलिक्सनंही एक मोठा धक्का दिला आहे. भारतातील अतिरेकी हल्ल्यांची टार्गेट्स पाकिस्तानचे लष्कर ठरवत असल्याच्या केबल्स विकिलिक्सने उघड केल्या आहेत.तसेच भारतात हल्ले करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आएसआयच्या अतिरेक्यांना परवानगी देत असल्याचं विकीलिक्सनं सांगितलंय. ही माहिती ग्वांटे -नामोमधून अटक करण्यात आलेल्या 800 संशयित अतिरेक्यांच्या चौकशीतून ही माहिती समोर आल्याचं विकिलिक्सनं म्हटलं.

close