बँकेवर कारवाई राजकीय हेतूने – अजित पवार

May 9, 2011 9:13 AM0 commentsViews: 2

09 मे

महाराष्ट्र राज्याची शिखर बँक समजल्या जाणार्‍या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर कारवाई झाली. या कारवाईमुळे राष्ट्रवादीचे धाबे दणाणले आहे. या बँकेच्या संचालक मंडळावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही एक आहे. या कारवाईमुळे नाराज झालेले अजित पवार यांनी थेट काँग्रेसवर टीका केली. 'एमएससी बँक संचालक मंडळ बरखास्तीचा निर्णय राजकीय हेतूनंच झाल्याचं म्हणतं पवारांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधला.

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अजितदादांच्या टीकेला प्रतीउत्तर दिलं आहे. ठाकरे म्हणतात, अजित पवारांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. एमएससी बँकेच्या व्यवहारात त्रुटी आढळल्यानेच कारवाई झालेली आहे. गेली अनेक वर्ष सत्ता असल्याने अजित पवारांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे अशा शब्दांत माणिकराव ठाकरे यांनी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर दिलंय.

close