ओसामाच्या पत्नी आणि मुलांच्या चौकशीसाठी अमेरिकेचा प्रयत्न

May 9, 2011 9:22 AM0 commentsViews: 9

09 मे

ओसामा बिन लादेन ठार होऊन आज एक आठवडा पूर्ण झाला आहे. आता पाकिस्तानने अल कायदाचा पूर्ण बंदोबस्त करण्यासाठी तयारी केली आहे. त्यासाठीच पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या ओसामाच्या पत्नी आणि मुलांच्या चौकशीसाठी अमेरिकेनं प्रयत्न सुरू केले आहेत.

ओसामाला ठार केल्यानंतर त्याच्या पत्नी आणि मुलांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलंय. ओसामाच्या पाच पत्नींपैकी सगळ्यात लहान अमाल हिची चौकशी अमेरिकेला करायची आहे. अमेरिकेनं लादेनच्या घरावर केलेल्या कारवाईत अमालवरही गोळी झाडण्यात आली होती, पण त्यातून ती बचावली आहे. दरम्यान पाकिस्ताननं अमेरिकेला चौकशीसाठी नकार दिल्याचं समजतंय.

दरम्यान ओसामावरील कारवाईनंतरही पाकिस्तानबाबत सकारात्मक भूमिका घेणार्‍या अमेरिकेनं आता पाकिस्तानला धक्का दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी लादेनला पाकिस्तानमध्ये स्थानिकांची मदत मिळत असावी असं वक्तव्य केलंय. लादेनच्या मदतीसाठी पाकिस्तानात एक नेटवर्कच होतं असं अमेरिकेला वाटत असल्याचं बराक ओबामांनी म्हटलंय.

close