अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा – खडसे

May 9, 2011 9:31 AM0 commentsViews: 2

09 मे

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवरच्या कारवाईमुळे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची संधी मिळाली. नाबार्डच्या अहवालावरुनच आरबीआयनं एमएससी बँकेवर कारवाई केली आहे. बँकेच्या संचालकांच्या संपत्ती जप्त केल्या पाहिजे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. एमएससी बँक चालवणार्‍या अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही खडसे यांनी मुंबईत केली आहे.

close