चंदीगड सीएफएसएलचा अहवाल चिदंबरम यांनी जाहीर करावा !

May 9, 2011 11:46 AM0 commentsViews: 2

09 मे

शांती भूषण यांचा वादग्रस्त सीडीत सहभाग आहे या मुद्यावरून बराच गदारोळ झाला. या सीडीची चंदीगड सीएफएसएलने तपासणी करून अहवाल दिला आहे. हा अहवाल गृहमंत्री पी चिदंबरम यांनी जाहीर करावा अशी मागणी शांती भूषण यांनी केली आहे. भूषण यांनी चिदंबरम यांना एक पत्र लिहून ही मागणी केली. हा अहवाल जाहीर केला तरी याविषयी सुरू असलेल्या चौकशीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. चंदीगड सीएफएसएलने ही सीडी बनवाट असल्याचा अहवाल दिला आहे.

close