26 /11 प्रकरणी शिकागो कोर्टात दुसरं आरोपपत्र दाखल

May 9, 2011 11:53 AM0 commentsViews: 1

09 मे

26/11 मुंबई हल्ला प्रकरणी अमेरिकेकडून शिकागो कोर्टात दुसरं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. लष्कर ए तोयबाच्या पाच जणाची नावं यात आहेत. साजीद मिर, अबू खफा, मझर इकबाल, मेजर इकबाल अशी यांची नावं आहेत. तर शिकागो कोर्टात 16 मे पासून यासंदर्भात अमेरिकन कोर्टात सुनावणी सुरु होणार आहे.

मेजर इकबाल हा आयएसआयशी संबंधित आहे. डेविड कोलमन हेडली याला 2006 मध्ये मेजर समीर अली या आयएसआयच्या अधिकार्‍याने लष्कर ए तोयबात सहभागी करुन घेतलं होतं. त्यानंतर हेडलीला लष्कर ए तोयबाच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं होतं. समीर अलीला लाहोरमध्ये इकबाल या नावानं ओळखलं जातं. इकबाल हा हेडलीला सर्व सूचना द्यायचा अशी माहिती सध्या समोर येतेय.

close