कवितांच्या ओळीत ‘एक पाऊस कधीचा’

May 9, 2011 11:20 AM0 commentsViews: 7

09 मार्च

'तो आणि ती' हा विषय कवी आणि त्याच्या कवितांसाठी कधीच जुना होणारा नाही. याचाच प्रत्यय आला ' एक पाऊस कधीचा' या कार्यक्रमात. विले पार्ला येथील डहाणूकर कॉलेजमध्ये झालेल्या या कार्यक्रमात जुन्यासोबतच नविन कवींच्या कविता सादर करण्यात आल्या. यात मंगेश पाडगावकर, शांता शेळके, ना. धों. महानोर, सदानंद डबीर यांच्या कवितांसोबत स्पृहा जोशी, विक्रम भागवत, योगेश जोशी आणि तेजस रानडे यांच्याही कवितांना तरूण संगीतकार मयुरेश माडगावकर यांनी संगीत दिलंय.

close