पुणे महापालिकेचे आयुक्त महेश झगडे यांची अखेर बदली

May 9, 2011 3:02 PM0 commentsViews: 44

09 मे

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त महेश झगडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी महेश फाटक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 महिन्यापूर्वी महेश झगडे मसुरीला ट्रेनिंगसाठी गेले होते.

त्यानंतर झगडे यांच्या बदलीची जोरदार चर्चा सुरू झाली होती. गेल्यावर्षी पावसाळ्यात पुणेकरांना अतिक्रमणामुळे जोरदार फटका बसला होता. झगडे यांनी अतिक्रमणाविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. त्यामुळेच त्यांची बदली करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.

आयुक्त नसल्यामुळे शहरातली अनेक काम ठप्प असल्याचं सांगत नविन आयुक्तांच्या मागणीसाठी महापौर मोहनसिंग राजपाल मुंबईला गेले होते. त्यानंतर दोनच दिवसात पुण्याला नविन आयुक्त मिळतील अशी घोषणाही त्यांनी केली होती. एकूणच महेश झगडे यांच्या बदलीवरून पुण्यामध्ये तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. त्यातच आज त्यांची बदली करण्यात आल्याने विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे.

close