कोल्हापूरमध्ये वडार समाजाचा गाढव मोर्चा

May 9, 2011 2:45 PM0 commentsViews: 72

09 मे

वडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज कोल्हापुरात गाढव मोर्चा काढण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून वडार समाज आपल्या मागण्यांसाठी पाठपुरावा करतोय. पण राज्य सरकारने मात्र अजूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच केलंय. त्यामुळे संतापलेल्या वडार समाजातील लोकांनी आज गाढव, म्हैस घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राज्य सरकराने या समाजाचे प्रश्न तत्काळ मिटवावेत अन्यथा उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

close