‘मानसिकता’ झाली ‘औपचारिकता’ बाकी !

May 9, 2011 3:24 PM0 commentsViews: 12

विनोद तळेकर, मुंबई

09 मे

शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्रीकरणाचे चित्र सत्यात येणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत. सोमवारी बाळासाहेब ठाकरे आणि रामदास आठवले यांच्या भेटीनंतर त्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकत्रीकरणाबाबतच्या चर्चेसाठी रामदास आठवले मातोश्रीवर दाखल झाले. साधारण तासभर झालेल्या चर्चेदरम्यान एकत्रीकरणाबरोबरच महागाई, भ्रष्टाचार, जैतापूर आंदोलन अशा आणखी काही मुद्दयांवरही चर्चा झाली. आठवलेंनंतर मग बाळासाहेबांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी सरकारच्या विरोधात एकत्र येण्याची गरज बोलून दाखवली.

एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावलेल्या रामदास आठवलेंना नवा घरोबा हवाय. तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीत मनसेचं आव्हान आणि मित्रपक्ष असलेल्या भाजपची वाढत चाललेली अरेरावी रोखण्यासाठी शिवसेनेलाही नव्या राजकीय मित्राची गरज आहेच.

त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती हे एकीकरण या दोन्ही पक्षाच्या राजकीय गरजेतून निर्माण झालंय. आणि म्हणूनच हे एकीकरण होत असताना स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीतील जागावाटप, नव्या युतीनंतरचे आपलं स्थान अशा सगळ्या गोष्टींची तपासून खात्री केल्यानंतरच रिपाई या एकीकरणाची औपचारिक घोषणा करायला हिरवा कंदील दाखवेल अशीच चिन्ह आहेत.

close