चेन्नईचा राजस्थानवर सुपर विजय

May 9, 2011 6:12 PM0 commentsViews: 1

09 मे

आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई सुपर किंग्जने आणखी एक सुपर विजय मिळवला आहे. चेन्नई सुपरने घरच्या मैदानावर खेळणार्‍या राजस्थान रॉयल्सचा 63 रन्सने पराभव केला. या विजयाबरोबरच चेन्नईची टीम पॉईंटटेबलमध्ये पुन्हा तिसर्‍या क्रमांकावर पोहचली आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या चेन्नईच्या प्रमुख बॅट्समनने दमदार कामगिरी केली. या जोरावर चेन्नईने 3 विकेट गमावत 196 रन्स केले. विजयाचे हे बलाढ्य आव्हान राजस्थानला पेलवलं नाही आणि त्यांना 133 रन्स करता आले. राजस्थानचे प्रमुख बॅट्समन फ्लॉप ठरले. अजिंक्य रहाणेने एकाकी लढत देत हाफसेंच्युरी केली. राजस्थानचा अकरा मॅचमधला हा पाचवा पराभव ठरला आहे.

close