बँक कुठल्याही पक्षाची मालकी नाही – मुख्यमंत्री

May 10, 2011 9:20 AM0 commentsViews: 7

10 मे

राज्य सहकारी बँक ही कुठल्याही पक्षाची मालकी नसून ती राज्याची स्वायत्त संस्था आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला हाणला आहे. मुख्यमंत्री सोलापूरच्या दौर्‍यावर असून तिथं ते पत्रकारांशी बोलत होते. एमएससी बँकेतला पैसा हा जनतेचा आहे. कर्जाच्या वसुलीची जबाबदारी बँकेनी नीट पाळलेली नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

दरम्यान,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमएससी बँकेसंदर्भात कालच सातार्‍यात आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता पुन्हा त्यावर प्रतिक्रिया नाही, असं अजित पवार यांनी पुण्यात म्हटलंय. मुंबईला जावून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष माणिकराव पाटील यांची आपण भेट घेणार असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलंय.

close