दहावी पास व्हा आता मुक्त शाळेतून !

May 10, 2011 9:29 AM0 commentsViews: 5

10 मे

आर्थिक परिस्थिती किंवा आणखी काही कारणांनी पाचवीनंतर शिक्षण अपूर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांना आता मुक्त शाळेच्या माध्यमातून दहावी उत्तीर्ण होता येणार आहे. केंद्र सरकारच्या मुक्तशाळेच्या धर्तीवर राज्यातर्फे ही मुक्त शाळा सुरु कऱण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी पुण्यामध्ये ही माहिती दिली.

विशेष म्हणजे या मुक्त शाळेसाठी विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देता येईल या दृष्टीने अभ्यासाची आखणी करण्यात येतेय. सध्या शिक्षण मंडळातर्फे या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात पंधरा वर्षापेक्षा वयाने अधिक असणार्‍यांसाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एकूण सहा विषयांची निवड करत त्यांना दहावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण होणं शक्य होणार आहे. सुतारकाम, नळजोड दुरुस्ती असे अनेक व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम या मुक्त शाळेतून शिकवण्यात येतील.

close