एमसीएच्या अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग

May 10, 2011 9:46 AM0 commentsViews: 1

10 मे

मुंबई क्रिकेट असोशियशनचे अध्यक्षपद यावेळीही शरद पवारांकडून ओढून घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. माजी कसोटीपटू आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर हे अध्यक्षपदासाठी इच्छूक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यानी मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन आपल्याला पाठिंबा जाहीर करावा अशी विनंती केल्याचं सूत्रांकडून कळतंय.

त्याचवेळी एमसीएचे आणखी एक उपाध्यक्ष आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री विलासराव देशमुख हेसुद्धा या अध्यक्षपदासाठी इच्छूक आहेत. त्यांच्या समर्थकांकडून विलासरावांना पाठिंबा द्यावा अशी विनंती एमसीएच्या अनेक सभासदांना केली जात आहे. ही अध्यक्षपदाची निवडणुक कधी घ्यायची यासाठी आज एमसीएमध्ये बैठक होतेय. गेली दहा वर्षे एमसीएची खुर्ची पटकावणारे पवार याही वेळेला खुर्ची आपल्याकडे ठेवतात की त्यांच्याकडून काढून घेतली जाते याकडे आता क्रिकेटचं आणि राजकीय वर्तूळाचं लक्ष लागले आहे.

close