वर्ध्यातील आगळया वेगळया बैलांच्या शर्यती

November 10, 2008 4:22 PM0 commentsViews: 24

10 नोव्हेंबर वर्धानरेंद्र मते विदर्भातल्या शेतक-यांचा आवडता खेळ म्हणजे शंकरपट अर्थात बैलांच्या शर्यती. पूर्वी हाच खेळ मकरसंक्रांतीला व्हायचा. पण दिवसेंदिवस हा खेळ लोप पावतोय. असं असलं तरी गेल्या दोन वर्षांपासून या खेळाला जपण्याचं काम वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथं केलं जातंय. बळीराजाच्या या उपेक्षित खेळाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न इथं होतोय. शंकरपटासह कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतक-यांना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्नही केला जातं आहे. या शंकरपटात मध्यप्रदेशातल्या बैतुल, पांढूर्णा या जिल्ह्यांसह राज्यातील अनेक ठिकाणाहून तब्बल चारशेहूनअधिक बैलजोड्या सहभागी झाल्या आहेत. शेतक-यांच्या सध्याच्या बिकट परिस्थितीत शंकरपट आणि कृषीप्रदर्शनाचा मेळ घालून, शेतक-यांना दिलासा देण्याचा एक वेगळा प्रयत्न आर्वी इथं होतोय.

close