शाळेच्या फीवाढ विरोधात पालक रस्त्यावर उतरले

May 10, 2011 10:45 AM0 commentsViews: 1

10 मे

मालाड येथील सुंदरनगरमधील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेने पालकांना विश्वासात न घेता एप्रिल महिन्याच्या अखेरीस फीवाढ केली. 2009 पासून आतापर्यंत शाळेने 100 टक्के फीवाढ केली. ही शाळा एसएससी बोर्डाची आहे. पण शाळा आयसीएसई बोर्डाची आहे असं सांगून शाळेने पालकांची फसवणूक केली. पाच हजार विद्यार्थी असलेल्या या शाळेत आता पालक फीवाढीविरोधात रस्त्यावर उतरले आहे.आज संध्याकाळी साडेसात वाजता सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेच्या पालकांनी मालाड सुंदरनगर मध्ये जाहीर सभा आयोजित केली आहे.

close