कलमाडींसाठी शहराध्यक्षांची पक्षविरोधात भुमिका – तिवारी

May 10, 2011 12:23 PM0 commentsViews: 2

10 मे

कॉमनवेल्थ प्रकरणात सुरेश कलमाडींना अटक झाल्यानंतर पुण्यामध्ये आता काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धुसफुस सुरु झाली आहे. उल्हास पवार, आमदार मोहन जोशी हे तर नाराज होतेच. पण त्याबरोबरच आता कलमाडी समर्थक मानल्या जाणार्‍या काँग्रेस कमिटी सदस्य गोपाळ तिवारी यांनी सुद्धा याविरोधात आघाडी उघडली आहे.

पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांना कॉमनवेल्थ घोटाळ्यामध्ये अटक झाल्यानंतर त्यांना काँग्रेस पक्षामधून निलंबित कऱण्यात आलं. त्यानंतर पुण्याचे शहराध्यक्ष अभय छाजेड आणि कलमाडी समर्थकांनी दिल्लीला पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन कलमाडींचे निलंबन रद्द करण्याची मागणी केली. तसेच कलमाडींच्या समर्थनार्थ ठरावही केला.

पक्षांनी भ्रष्टाचाराविरोधात भुमिका घेत कलमाडींना निलंबित केलं आहे. त्यामुळे कलमाडींना समर्थन देण्याचा प्रयत्न करत शहराध्यक्ष हे पक्षविरोधी भुमिकाच घेत आहेत असा आरोप तिवारींनी केला आहे. कलमाडींचे समर्थन न करता छाजेड यांनी पक्षाच्या भुमिकेचा स्विकार करुन शहराध्यक्ष पदाची प्रतिष्ठा राखावी असंही ते म्हणाले.

close