उच्चशिक्षित भामट्याने अंधाना नोकरीच आमिष देऊन फसवले

May 10, 2011 12:32 PM0 commentsViews: 3

अजित मांढरे, मुंबई

10 मे

अंधांच्या अपंगत्वाचा फायदा घेऊन त्यांना फसवणार्‍या एका उच्च शिक्षित तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहेत. आपण सरकारी अधिकारी असून नोकरी लावून देतो अशी आमिष दाखवून त्यांना शेकडो अंधांना लाखोंचा गंडा घातला आहे.

व्हिक्टर डिसुझा अंध आहेत. त्यांच्यासारखे असंख्य अपंग तरुण रोज लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. ट्रेनमध्ये गाठून संजय काळूसकर या इसमाने त्यांना फसवलं. आपण मंत्रालयात आरोग्य खात्यात कामाला आहोत. तिथे नोकरी लावून देतो, असं त्यानं त्यांना सांगितलं पण त्यांना नोकरी मिळालीच नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संजयने आता पर्यंत तीन अंधांना फसवले आहे. आणि त्याच्याकडे एक डायरी मिळाली ज्यात 50 पेक्षा जास्त लोकांचे नाव नंबर आणि पत्ते आहेत. उच्चशिक्षित असलेला संजय फाडफाड इंग्रजी बोलायचा आणि याचा फायदा घेत तो अंपग तरुणाशी मैत्री करायचा. मी तुम्हाला नोकरी लावून देतो असं तो सांगायचा. त्याच्या याच हुशारीने तो आज गजाआड झाला आहे.

अपंगांच्या अपंगत्वाचा फायदा घेऊन त्यांना फसवणारा संजय हा एकटा तरुण नसून त्यांच एक मोठं रॅकेट आहे. असं पोलीस तपासात समोर आलंय. पोलीस लवकरच या रॅकेटचा भांडाफोड करणार आहे.

close