म्हाडाच्या गलथान कारभारा विरोधात लढा

May 10, 2011 1:35 PM0 commentsViews: 2

सिटीझन जर्नलिस्ट श्रीकांत काशीकर

10 मे

म्हाडाची घरं जरी सर्वसामान्यांना परवडणारी असली तरी घर मिळाल्यानंतर ग्राहकांना काय काय त्रास होतात याची अनेक उदाहरणं नागपूरमध्ये बघायला मिळत आहे. घराच्या रजिस्ट्रेशनसाठी 18 वर्षांपासून नागपूरकरांना झगडावे लागतंय. पण म्हाडाचे अधिकारी मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही. म्हाडाच्या या गलथान कारभारा विरोधात आयबीएन लोकमतचे 80 वर्षांचे सिटीझन जर्नालिस्ट श्रीकांत काशीकर यांनी आता लढाईच सुरु केली आहे.

नागपूरातल्या नरेंद्रनगरमधली म्हाडा कॉलनी. गेल्या 18 वर्षांपासून वसलेली. इथल्या रहिवाशांनी पैसे भरूनही त्यांना म्हाडाने अजून रजिस्ट्रेशनच करून दिलेलं नाही. यासाठी लढताहेत 80 वर्षांचे श्रीकांत काशीकर. रजिस्ट्रेशन नसल्याने पाणी, वीज, रस्ते यासारख्या सोयींचाही इथं अभाव आहे. या कॉलनीत अतिक्रमण वाढत आहे अन ते ही म्हाडाच्या आशीर्वादाने.

सतत पाठपुरावा केल्याने फक्तं काशीकरांना म्हाडाने रजिस्ट्रेशन करून दिलं. त्यासाठी म्हाडाला 15 हजारांचा दंडही झाला. पण इतर नागरिकांसाठी माझी लढाई अजुनही सुरूच आहे. 1997 पासून आम्ही या प्रश्नाचा पाठपुरावा करतोय. पण याकडे म्हाडा लक्षच द्यायला तयार नाही अशा स्थितीत आम्ही जावं तरी कुणीकडे. जोपर्यंत या सर्व नागरिकांना म्हा़डा रजिस्ट्रेशन करून देणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राणार आहे.

close