एमआयडीसी जमीन घोटाळा ; अधिकार्‍यांनी परस्पर विकल्या जमिनी !

May 10, 2011 12:38 PM0 commentsViews: 3

10 मे

औरंगाबादमध्ये एपीआय कंपनीची जमीन विक्री करण्याची परवानगी कंपनीला देताना एमआयडीसीने कोणतेही नियम पाळले नाहीत. कंपनीकडून मुख्यत्यारपत्र घेतलेले विनोद सुराणा आणि संतोष मुथियान हे स्वत:च जमीन मालक असल्याच्या आविर्भात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करत गेले. त्याचवेळी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी या दोघांना आणि कंपनी व्यवस्थापनाला निर्बंध घालणं बंधनकारक होते. खरं तर कामगारांंची देणी देण्यासाठी पन्नास एकर जागा विकण्याची गरज होती काय ? असाही प्रश्न आता विचारला जातोय.

1. जागा विक्रीची परवानगी एपीआय कंपनीला असतानाविनोद सुराणा आणि संतोष मुथियाना यांना मुख्यत्यारपत्र का ?2. बिल्डरांना मुख्यत्यारपत्र देण्याचा कंपनीला अधिकार आहे का ? 3. यात सरकारची भूमिका काय 4. आता ही जागा उरलेल्या काळासाठी विकण्यात आल्यामुळे तिथं व्यावसायिक आणि निवासस्थाने विकत घेणार्‍यांची ती फसवणूक नाही का ?

असे सवाल निर्माण झाले आहे. आणि उद्या हे प्रकरण कोर्टात गेलं आणि या सगळ्या व्यवहारांना हादरा बसला तर जबाबदार कोण असाही प्रश्न विचारला जातोय.

एमआयडीसी जमीन घोटाळा

1. जागाविक्रीची परवानगी एपीआय कंपनीला बिल्डरांना मुखत्यारपत्र का? 2. बिल्डरांना मुखत्यारपत्र देण्याचा कंपनीला अधिकार आहे का? 3. यात सरकारची भूमिका काय ?4. व्यावसायिकांची ही फसवणूक नाही का ?

close