गांगुलीचा ‘सहारा’ पुण्याचा विजय

May 10, 2011 3:06 PM0 commentsViews: 1

10 मे

बंगाल टायगर सौरव गांगुलीने आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन केलंय. आयपीएलच्या चौथ्या हंगामात आपली पहिलीच मॅच खेळणार्‍या गांगुलीनं पुणे वॉरियर्सला शानदार विजय मिळवून दिला. पुणे टीमनं घरच्या मैदानावर खेळणार्‍या डेक्कन चार्जर्सचा 6 विकेट राखून पराभव केला.

गांगुलीने नॉटआऊट 32 करत पुण्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पहिली बॅटिंग करणार्‍या डेक्कनला 8 विकेट गमावत 136 रन्स करता आले. विजयाचे हे माफक आव्हान पुणे टीमनं 19 व्या ओव्हरमध्ये पार केलं. पुणे टीमचा हा सलग दुसरा विजय ठरला. स्पर्धेत पुणे टीमनं आता 4 विजय मिळवत सातव्या क्रमांकावर झेप घेतली.

घरच्या मैदानावर खेळणार्‍या डेक्कनचे बॅट्समन या मॅचमध्येही चार्ज झाले नाहीत. ओपनिंगला आलेल्या शिखर धवन आणि रवि तेजाने सुरुवात चांगली केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 51 रन्सची पार्टनशिप केली. शिखर धवनने 17 बॉलमध्ये 24 रन्स केले. तर रवि तेजानं 27 बॉलमध्ये 30 रन्स केले.

चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या जे पी ड्युमिनीनं सावध बॅटिंग करत स्कोर वाढवला. ड्युमिनीनं 30 बॉलमध्ये 1 फोर मारत 30 रन्स केले. पण इतर बॅट्समन फ्लॉप ठरले. पुण्यातर्फे मिचेल मार्श सर्वाधिक यशस्वी बॉलर ठरला. मिचेलने 4 ओव्हरमध्ये फक्त 25 रन्स देत 4 विकेट घेतल्या.

तर कॅप्टन युवराजनंही केवळ 17 रन्समध्ये 2 विकेट घेतल्या. पुणे वॉरियर्सच्या जेसी रायडर आणि मनिष पांडेनंही दमदार ओपनिंग केली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 55 रन्सची पार्टनरशिप केली. जेसी रायडने 20 बॉलमध्ये 35 रन्स केले. तर मनिष पांडेने सर्वाधिक 49 रन्स केले. 42 बॉलममध्ये त्याने 6 फोर आणि 2 सिक्स मारले.

close