पाण्यात मल्लखांबाचा थरार

May 10, 2011 12:51 PM0 commentsViews: 3

10 मे

मल्लखांबाच्या प्रात्याक्षिकांतील थरार आपण नेहमीच अनुभवतो पण हाच मल्लखांब जर पाण्यात उभारला असेल तर. अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे गेली काही वर्ष हा अभिनव प्रयोग केला जातोय. आणि त्याला प्रेक्षकांचा उत्सफुर्त प्रतिसादही लाभतोय.

जलतरणातील चपळता आणि मल्लखांबातील लवचिकता याचा अनोखा मिलाप म्हणजेच पाण्यातील मल्लखांब. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात हा आगळा वेगळा प्रयोग सादर करण्यात आला आणि त्याला प्रेक्षकांचाही चांगाल प्रतिसाद लाभला. केवळ नाविन्य म्हणून हा अविष्कार केला जात नाही तर त्यामागे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा खास हेतुही आहे. मल्लखांबातील थराथराक प्रात्याक्षिकांसोबतच पाण्यातून पंढरीच्या पालखीचा प्रवास आणि मशालींसोबतची कसरत प्रेक्षकांची दाद मिळवून गेली.

close