बँक प्रकरणी राज्यापालांनी संबधित राज्याच्या मंत्र्यांना तत्काळ बडतर्फ करावे !

May 10, 2011 3:15 PM0 commentsViews: 1

10 मे

शिखर बँकेचा गैरव्यवहार हा जनतेचा विश्वासघात आहे. राज्यापालांनी संबधित राज्याच्या मंत्र्यांना तत्काळ बडतर्फ करावे आणि या गंभीर बाबीची चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन तातडीनं बोलवावे अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे. शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाईंच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घातली. दिवाकर रावते, विनोद घोसाळकर, एकनाथ शिंदे, राजेश क्षिरसागर यांचा समावेश होता. या मुद्द्यावर शिवसेना राज्यभर आंदोलन करणार आहे.

close