एशियन आणि अमेरिकन मार्केट्समध्ये तेजी

November 10, 2008 2:25 PM0 commentsViews: 2

10 नोव्हेंबर मुंबईदिवसात शेअरमार्केटनं एक शानदार ट्रेडिंग सेशन दाखवलंय. एशियन आणि अमेरिकन मार्केट्समध्येही तेजी टिकून राहीली. त्यामुळे भारतीय शेअरमार्केटमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. क्लोजिंगच्या वेळेस सेन्सेक्स 517.87 अंशांची उसळी घेत 10,536.16च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी 175.25 अंशांची तेजी दाखवत 3148.25च्या स्तरावर बंद झाला. ग्राहकपयोगी वस्तू वगळता इतर सर्व सेक्टर्समध्ये जोरदार खरेदी झालीय. विशेषत: मेटल्स, पॉवर, कॅपिटल गु्‌डससारखे काही सेक्टर्स आज जास्त तेजीत होते. टॉप गेनर्समध्ये होते स्टरलाइट, टाटा स्टिल, रिलायन्स इन्फ्रा,हिंडाल्को हे शेअर्स तर टॉप लूजर्समध्ये आयटीसी, मारुती सुझुकी यांच्या शेअर्सना तोटा झालेला दिसला.

close