जळगावमध्ये ग्रामसमितींना बरखास्त करण्याचा ठराव

May 10, 2011 3:21 PM0 commentsViews: 1

10 मे

जळगाव जिल्ह्यातील कडक तापमानाने हैराण झालेल्या नागरिकांना आता भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार अशी चिन्ह दिसत आहे. जिल्ह्यातील 16 धराणांपैकी वाघूर आणि तोंडापूर या 2 धरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के झाला आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाने तातडीची आढावा बैठक घेतली. गावपातळीवर महत्वाची मानली जाणार्‍या ग्रामसमितींना बरखास्त करण्याचा ठराव या सभेत एकमताने करण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत लोकप्रतिनीधींनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं.

close