दाऊद इब्राहिम पाकिस्तानात नाही !

May 10, 2011 5:23 PM0 commentsViews: 24

10 मेमोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात आहे हा भारताचा दावा पाकिस्तानने फेटाळून लावला. दाऊद पाकिस्तानात नाही, असं पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक यांनी सीएनएन आयबीएनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. दाऊद पाकिस्तानातच आहे असं कालच केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना रेहमान मलिक यांनी हे उत्तर दिलं. त्याचबरोबर मुंबई हल्ल्यातल्या सूत्रधारांचे व्हाईस सॅम्पल्स भारताला देण्यासाठी पाकिस्तान कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितलं. दरम्यान दाऊद हा पाकिस्तानातच आहे आणि कराची तसेच इस्लामाबादमध्ये त्याची घरं आहेत असं केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई यांनी म्हटलंय.

close