अशोक चव्हाण, देशमुख यांना समन्स

May 11, 2011 9:14 AM0 commentsViews: 5

11 मे

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख यांना न्यायालयीन चौकशी आयोगाने समन्स बजावलं आहे. या दोघांनीही न्यायालयीन आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 23 मेपर्यंत या दोघांना उत्तर देण्याचे आदेशही आयोगाने दिले आहे.

पहिल्या टप्प्यात न्यायालयीन चौकशी आयोगाने एकूण 17 जणांना समन्स बजावणार आहेत. यापैकी आतापर्यंत तिघांना नोटीस बजावण्यातआली आहे. सध्या ब्रिगेडियर दीपक सक्सेना यांची सध्या चौकशी सुरू आहे. तर आता विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांनासमन्स बजावली गेली आहेत. यानंतर प्रदीप व्यास, पी.व्ही.देशमुख, रामानंद तिवारी, आर.सी.ठाकूर, सुनील तटकरे, सुरेश प्रभू, सुशीलकुमार शिंदे, कन्हैय्यालाल गिडवाणी, गीता कश्यप, एस.एस.जोग, संतोष दौंडकर, एस.एस.लांबा यांनाही टप्प्या टप्प्यानेसमन्स बजावली जाणार आहेत.

close