बँकेवरुन आघाडीत बिघाडी ; मंत्रिमंडळाची बैठक रद्द

May 11, 2011 9:33 AM0 commentsViews: 7

11 मे

राज्याची शिखर बँक असलेल्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला वाद विकोपाला गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावलीच नाही. मंत्रिमंडळाची बैठक ठेवली असती तर कदाचित राज्य बँकेच्या वादावरुन राष्ट्रावादीच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातला असता किंवा बैठकीमध्ये वाद निर्माण केले असते अशी भीती मुख्यमंत्र्यांनी वाटत असल्याची जोरदार चर्चा राजकीये वर्तुळात सुरु आहे.

close