भोपाळ गॅस प्रकरणी दुरूस्ती याचिका कोर्टाने फेटाळली

May 11, 2011 9:51 AM0 commentsViews: 3

11 मे

भोपाळ गॅस दुर्घटनेप्रकरणी सीबीआयने दाखल केलेली दुरूस्ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. पंचवीस वर्षांपूर्वी झालेल्या या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या युनियन कार्बाईडच्या अधिकार्‍यांवर कठोर शिक्षेची मागणी करणारी याचिका सीबीआयने दाखल केली होती.

सध्या या अधिकार्‍यांवर फक्त दुर्लक्ष करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पण सीबीआयने या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा आरोप लावण्यात यावा अशी मागणी केली होती. पण याचिका दाखल करायला उशीर झाल्यामुळे आणि याचिकेत केस पुन्हा उघडण्याविषयी सबळ कारण नसल्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आली.

close